अहमदनगर: विवाहित तरुणीच्या घरात घुसून बलात्कार, लग्नापूर्वीचे फोटो वडिलांना दाखवण्याची धमकी
Ahmednagar News: लग्नापूर्वीचे फोटो वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन 21 वर्षीय विवाहित तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार (Rape) केल्याची घटना.
राहुरी: लग्नापूर्वीचे फोटो वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन 21 वर्षीय विवाहित तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना 17 मे रोजी राहुरी पोलीस ठाणे हद्दीत घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 21 वर्षीय तरूणी ही 17 मे रोजी सकाळी 11.30 वाजे दरम्यान घरात एकटी असताना आरोपी सुजित लोंढे हा दारू पिऊन आला आणि अनधिकृतपणे तिच्या घरात घुसला. नंतर त्याने घराची आतील कडी लावली. तरूणीने आरडाओरडा केला असता त्याने तिचे तोंड दाबले. तुझे लग्नापूर्वीचे फोटो तुझ्या वडिलांना दाखविल. अशी धमकी देवून तरूणीवर अत्याचार केला. तरूणीचा पती घरी येताच आरोपी तेथून पळून काढला. तरूणीने घडलेली सर्व घटना तिच्या पतीला सांगून राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि सर्व प्रकार सांगितला.
तरूणीच्या फिर्यादीवरून आरोपी सुजित भाऊसाहेब लोंढे, रा. नरसाळी ता. श्रीरामपूर याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 452, 506 प्रमाणे धमकी देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत. घटनेनंतर आरोपी हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: Rape by breaking into the house of a married girl
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App