Home क्राईम संतापजनक: सख्ख्या भावाने केला अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार

संतापजनक: सख्ख्या भावाने केला अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार

Rape Case Sakhya's brother sexually abused his minor sister

पिंपरी चिंचवड | Rape Case: चिंचवड बिजलीनगर येथे एका १७ वर्षीय  मुलीवर सख्ख्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच कोणाला काही न सांगण्याची धमकी देण्यात आली. मात्र मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आली आहे.

याबाबत बुधवारी अल्पवयीन मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पिडीत मुलगी आरोपीची सख्खी लहान बहिण आहे. पिडीत मुलगी बारावीत शिकत आहे तर आरोपी इंजिनीयरचे शिक्षण घेत आहे. हे दोघेही भाऊ बहिण राहत्या घरात हॉलमध्ये झोपले असता आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व कोणास काही न सांगण्याची धमकी दिली. मात्र पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने आईच्या निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणी केली असता ८ आठवड्याची गरोदर राहिल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक उबाळे तपास करीत आहे.  

Web Title: Rape Case Sakhya’s brother sexually abused his minor sister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here