Home अहमदनगर या कारणामुळे अहमदनगरच्या महिलेने घाटात दरीत घेतली उडी

या कारणामुळे अहमदनगरच्या महिलेने घाटात दरीत घेतली उडी

woman from Ahmednagar jumped into a valley in the ghat

सिंधुदुर्ग | Ahmednagar: पती बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन आंबोली घाटाच्या खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न कमल रामनाथ इंडे या महिलेने केला असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. दरीत पडल्यामुळे अंगावर जखमा व पाय जखमी झाला आहे. तिला उपचारासाठी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, आंबोली बस स्थानकावरून एका तरुण महिलने संजय पाटील नामक रिक्षा चालकाची रीखा सावंतवाडीला जायचे असल्याचे सांगून भाड्याने मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ते सावंतवाडी च्या दिशेने निघाले. दरम्यान घाटात तिने दरड पडलेल्या एकाठिकाणी रिक्षा थांबविली. घाटातील नजारा बघण्यासाठी घाटातील संरक्षक कठड्यावर चढली. हे रिक्षा चालकाने पाहिल्यावर तिला खाली उतरण्याची विनंती केली तितक्यात तिने चप्पल व ओढणी संरक्षण कठड्यावर ठेऊन खाली उडी मारली. ती जवळपास दोनशे फुट खाली कोसळली. घाबरलेल्या रिक्षाचालकाने थेट आंबोली पोलीस स्टेशनला गेला व सर्व झालेली घटना सांगितली.

त्यानंतर आंबोली पोलीस व पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांच्या प्रयत्नाने तिला जिवंत सुखरूप बाहेर काढले. तिला रुग्णवाहिकेद्वारे आंबोली प्राथमिक केंद्रात नेण्यात आले.

Web Title: woman from Ahmednagar jumped into a valley in the ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here