Home अहमदनगर बँक घोटाळाप्रकरणी मालपाणीला अटक

बँक घोटाळाप्रकरणी मालपाणीला अटक

नगर आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी,  १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Malpani arrested in bank scam

अहमदनगर | Ahmednagar: शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील योगेश मालपाणी याला आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली आहे.

शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. यामध्ये मशिनरीचा पुरवठा योगेश मालपाणी यांच्याद्वारे झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.  पोलीस अधीक्षक प्रांजल सोनवणे यानी या माहितीस दुजोरा दिला आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Malpani arrested in bank scam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here