Home अहमदनगर पतीनेच केला पत्नीचा घात: तुला मुल होण्यासाठी माझ्या मित्राशी शरीरसंबंध ठेव म्हणत...

पतीनेच केला पत्नीचा घात: तुला मुल होण्यासाठी माझ्या मित्राशी शरीरसंबंध ठेव म्हणत अत्याचार

Rape Case Torture you to have sex with my friend to have a baby

पाथर्डी | Rape Case: पती व त्याच्या मित्राने मिळून पत्नीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आली असून आरोपी पती व मित्राला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तुला मूल होण्यासाठी माझ्या मित्राशी शरीरसबंध ठेव, असे सांगत पतीनेच पत्नीचा घात करण्यात आला आहे,  पतीने गोळ्या दिल्या आणि मला चक्कर आली. त्यानंतर पती व त्याच्या मित्राने माझ्यावर अत्याचार केला. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. दुसर्‍या दिवशीही दोघांनी पुन्हा अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे घडली.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पागोरी पिंपळगाव येथे एक कुटुंब रहात असून पत्नीला मूल होत नसल्याने पतीने 22 सप्टेंबर 2021 रोजी त्याचा मित्र राहुल शिंदे याला रात्री दहा वाजता घरी आणले. घराची आतुन कडी लावली. तुला मुल होण्यासाठी तू शिंदे याच्या सोबत शरीरसंबध (sex) ठेव असे सांगितले. तेव्हा पत्नीने विरोध केला, त्यानंतर पतीने तिला दोन गोळ्या दिल्यानंतर तिला चक्कर आली. त्यानंतर शिंदेने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीनेही अत्याचार केला. दुसर्‍या दिवशी पुन्हा रात्री दहा वाजता शिंदे व पती दोघेही घरी आले व त्या दोघांनी पुन्हा अत्याचार केला.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

याप्रकरणी  पीडित महिलेने पाथर्डी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांना शिंदे व महिलेचा पती विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहे.

Web Title: Rape Case Torture you to have sex with my friend to have a baby

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here