Home Accident News Accident: दोन टेम्पोत धडक एक ठार , एकाचे  दोन्ही पाय तुटले

Accident: दोन टेम्पोत धडक एक ठार , एकाचे  दोन्ही पाय तुटले

Two Tempo Accident One death

पारनेर | Accident: पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर शिवारात नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर दोन टेम्पो अपघातात एक तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत काशिनाथ सखाराम इले याने टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  टाकळी ढोकेश्वर शिवारात नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान तकली ढोकेश्वरपासून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १ किलोमीटर अंतरावर दोन टेम्पोची धडक बसली. या अपघातात क्रमांक एम,एच. २१ बी.एच.८५३५ वरील क्लीनर यांच्या डोक्याला मार लागल्याने सोमनाथ भाऊसाहेब सादरे रा. गाडे जळगाव ता. औरंगाबाद हा जागीच ठार झाला आहे. टेम्पो चालक दिनेश गणेश गोल्डे रा. रेव्गाव ता. जालना याचे दोन्ही पाय तुटले असून गंभीर जखमी झाला.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

दुसरा टेम्पो एम.एच १६ सीसी ८०४७ वरील क्लीनर सोमनाथ केदार व चालक दत्तात्रय गीताराम वावरे रा. शिक्री ता. पारनेर हे जखमी झाले आहेत. टाकळी ढोकेश्वर शिवारात नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर याच्याविरुध्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी कडूस हे करीत आहे.  

Web Title: Two Tempo Accident One death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here