Home Accident News ट्रक व वॅगनर  कार यांच्यात भीषण अपघात एक जण ठार

ट्रक व वॅगनर  कार यांच्यात भीषण अपघात एक जण ठार

Shrigonda Truck and Car Accident One death

श्रीगोंदा | Accident: श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरातील कान्हेरमळा परिसरात भरधाव वेगाने असणारा मालवाहतूक ट्रक व वॅगनर कार यांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक जण ठार झाला आहे.

वॅगनर कारमधील भाऊअप्पा शिवाजी काळे वय ४५ रा. हिवरेझरे ता. नगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, दौंडकडून नगरकडे जाणारी भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रक आणि नगरकडून दौंडकडे जाणारी वॅगनर कार यांची रात्री ९ वाजेच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वॅगनर  कारचा चक्काचूर झाला आहे.

Non Veg Jokes In Hindi: शराब और आशिकी में क्या संबंध है?

सदर अपघात घडताच ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे. या अपघाताची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्यात कळताच पोलीस उप निरीक्षक प्रकाश बोराडे व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा केला.  

Web Title: Shrigonda Truck and Car Accident One death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here