Home Crime News कपडे दाखविताना स्पर्श केला अन आमिष दाखवून विवाहितेला लॉजवर नेऊन बलात्कार

कपडे दाखविताना स्पर्श केला अन आमिष दाखवून विवाहितेला लॉजवर नेऊन बलात्कार

Rape of a married woman by taking her to a lodge

गेवराई: शहरातील अहिल्यानगर भागातील २९ वर्षीय विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून शंकर दिलीप मोरे वय ३२ रा. राजपिंपरी याने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गेवराई पोलिसांत शुक्रवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर मोरे याच्या शहरात असलेल्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी अहिल्यानगरातील २९ वर्षीय विवाहिता गेली असता तिला कपडे दाखविताना वाईट उद्देशाने स्पर्श केला. तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आलात  म्हणून चहा घ्या म्हणत बराच वेळ थांबवले. कपड्याचे बिल तयार करून त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे आहे असे सांगितले. त्यानंतर शासकीय आयटी आय परिसरात बोलावले. तिथे गेल्यावर त्याने अतिप्रसंग केला. तुझ्याशी लग्न करतो, तुझी मुले सांभाळतो असे सांगून बळजबरीने रिक्षात बसवून मादळमोही या ठिकाणी लॉजवर नेऊन बलात्कार केला. लग्नाची विचारणा केली असता तू विशिष्ठ समाजाची आहेस तुम्हाला कसली इज्जत असे म्हणून जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच महिलेने पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दाखल करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Rape of a married woman by taking her to a lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here