Rape: प्रेमाचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर
Pune Rape News: प्रेमाचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना.
पिंपरी : प्रेमाचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual abused) केले. यात मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ मध्ये भोसरी गावठाणात घडला.
याप्रकरणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार छोटू (वय २२, रा. बिहार ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मुलीची आणि आरोपीची नोव्हेंबर २०२२ मध्ये ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने मुलीला त्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर प्रेम असल्याचा बहाणा करून लैंगिक अत्याचार (Rape) केला. त्यामध्ये मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rape of a minor girl under the pretense of love in bhosari
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App