Home अहमदनगर अहमदनगर: खासगी क्लासला जाणाऱ्या मुलीचा विनयभंग

अहमदनगर: खासगी क्लासला जाणाऱ्या मुलीचा विनयभंग

Ahmednagar Crime: खासगी क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काटेरी वनात नेऊन विनयभंग (Molested) केल्याची घटना.

girl going to a private class was molested

श्रीरामपूर | Shrirampur:  श्रीरामपुर शहरातील एका खाजगी क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन, तिला मोटरसायकलवर बसवुन रेल्वेब्रीज परीसरातील काटेरी वनात नेवुन विनयभंग केला तसेच त्यावेळी तिचे सोबत फोटो काढले, तिला मारहाण केली तसेच फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देणार्‍या आरोपीस काल पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील कांदा मार्केटच्या मागे राहत असलेल्या प्रमोद अरुण शिंदे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला तसेच त्यावेळी तिचे सोबत फोटो काढले, तिला मारहाण केली.त्यानंतर वेळोवेळी फोटो व्हायरल करण्याची तसेच आत्महत्या करण्याची धमकी देवुन वेळोवेळी यातील अल्पवयीन मुलाचा विनयभंग केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथकास आदेश दिले त्यानुसार तपासाची चक्रे फिरवत तपास पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता, आरोपी श्रीरामपुर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचुन प्रमोद अरुण शिंदे यास शिताफिने अटक केली आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: girl going to a private class was molested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here