Home अहमदनगर खा. विखे यांच्यासमोरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये राडा

खा. विखे यांच्यासमोरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये राडा

Ahmednagar news:  सभेत खासदार विखे यांच्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये (BJP and NCP)बाचाबाची होत चांगलाच राडा.

Rada between BJP and NCP supporters in front of Vikhe

 

श्रीगोंदा | Shrigonda: खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील नगर-दौंड महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रांरभ केला. मात्र त्यावेळी झालेल्या सभेत खासदार विखे यांच्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होत चांगलाच राडा झाला. त्यामुळे येथे काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी हस्तक्षेप करत  वाद मिटवला.

याबाबत्त मिळालेली माहिती अशी की, कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते व राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विखे यांचे कौतुक केले. त्यांच्याकामाबाबत त्यांनी अभिनंदन केले. अॅड. काकडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले. त्यानंतर पुन्हा नाहाटा यांनी माईक हातात घेतला आणि काकडे यांच्यावर शाब्दिक वार सुरु केले. त्याचवेळी काकडे उठून उभे राहिले आणि दोन्ही नेत्यांमध्ये तुफान शाब्दीक बाचाबाची झाली  आण्णासाहेब शेलार यांनी पुढे होऊन कार्यकर्ते बाजूला केले मात्र नंतर खासदार विखे यांनी हे प्रकरण मिटविले.

Web Title: Rada between BJP and NCP supporters in front of Vikhe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here