Home महाराष्ट्र आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार

आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार

Crime News:  आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार (abused) केल्याची घटना.

a 25-year-old married woman was abused by threatening to make her bathing photos viral

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पीडिताच्या तक्रारीवरून एकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमेश्वर प्रकाश कोरडे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  हिंगोली तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला. पीडित महिला ही आंघोळ करत असताना आरोपीने तिचे 2021 मध्ये फोटो काढले होते. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत घरात शिरला आणि 6 फेब्रुवारी 2022 पासून त्याने अत्याचार सुरु केला.

आरोपी परमेश्वर प्रकाश कोरडे याने 2021 मध्ये पीडित महिला आंघोळ करत असताना, गुपचूप तिचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. तसेच पुढे तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची महिलेला धमकी दिली. हेच फोटो दाखवत धमकी देत, बळजबरीने महिलेवर अत्याचार केला. या घटनेने महिला प्रचंड घाबरली होती. पण आपले फोटो व्हायरल होतील, या भीतीने तिने कुठेच याची वाच्यता केली नाही. दरम्यान आरोपीकडून होणार त्रास अधिक वाढल्याने तिने अखेर घडलेला सर्व प्रकार पती, सासू-सासऱ्यांना सांगितला. त्यामुळे ते जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही, आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे अखेर पीडिताच्या तक्रारीवरून परमेश्वर प्रकाश कोरडे याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: a 25-year-old married woman was abused by threatening to make her bathing photos viral

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here