Home संगमनेर मोठी बातमी!  पुणे-संगमनेर-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

मोठी बातमी!  पुणे-संगमनेर-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

Pune-Nashik high Speed Railway:  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Ministry of Railways approves Pune-Nashik High Speed ​​Railway

Pune-Nashik high Speed Railway : पुणे संगमनेर नाशिक हायस्कूल रेल्वे बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं पाहता इंडियन रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली आहे. दरम्यान आता रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

यामुळे आता हा रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पुणे-अहमदनगर-नाशिक दरम्यानची कनेक्टिव्हिटी अजूनच सुधारणार असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर याबाबत माहिती दिली असून पुणे नासिक हाय स्पीड रेल्वेला मान्यता दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

या रेल्वे प्रकल्पाबाबत अधिक माहिती अशी की या प्रकल्पासाठी 1450 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी तीस हेक्टर खाजगी जमीन संपादित झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. खाजगी जमिनीशिवाय सरकारी आणि वन विभागाची जमीन संपादनाची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

दरम्यान आज आपण या रेल्वेमार्गाबाबत थोडक्यात आढावा जाणून घेणार आहोत. पुणे-अहमदनगर-नाशिक या हायस्पीड रेल्वे मार्गासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 50% केंद्र आणि 50 टक्के रक्कम ही राज्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. हा रेल्वे मार्ग एकूण 235 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा रेल्वे मार्ग पुणे अहमदनगर नाशिक या तिन्ही जिल्ह्यांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असल्याने मध्य महाराष्ट्रातील या तिन्ही जिल्ह्यांचा विकास यामुळे सुनिश्चित होणार असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे यामुळे नासिक ते पुणे हे अंतर मात्र पावणे दोन तासात पार करता येणे शक्य होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे – नाशिकदरम्यान धावणाऱ्या या हाय स्पीड रेल्वे मार्गावर २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग उभारले जाणार आहेत. विशेष बाब अशी की, भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम केले जाणार असल्याची माहिती देखील दिली गेली आहे. विशेष बाब अशी की हा रेल्वे मार्ग पुणे ते मांजरी एलिव्हेटेड (पुलावरून) प्रस्तावित असून मांजरी ते नाशिक जमिनीवरून रेल्वे धावणार आहे.

खरं पाहता पुणे-नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. अशा परिस्थितीत हा पुणे-अहमदनगर-नाशिक हायस्पीड रेल्वे निश्चितच पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्यासाठी मोठा फायदेशीर राहणार आहे. यामुळे पुणे अहमदनगर नाशिक या तिन्ही जिल्ह्याच्या विकासाला चालना लाभणार आहे.

Web Title: Ministry of Railways approves Pune-Nashik High Speed ​​Railway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here