Home अकोले अकोलेतील घटना: विजेच्या खांबावरून पडून वायरमनचा जागीच मृत्यू

अकोलेतील घटना: विजेच्या खांबावरून पडून वायरमनचा जागीच मृत्यू

Akole News:  खांबावरून कोसळून जागीच मृत्यू (Died), डोक्यात दगड घुसल्याने जागीच गतप्राण.

Wireman died on the spot after falling from an electric pole

अकोले: अकोले तालुक्यातील वीरगाव येथून दुर्दैवी घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील गणोरे येथील भाऊसाहेब रामनाथ आंबरे वय ५२ या वायरमनचा विजेच्या खांबावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीरगाव येथे घडली.

भाऊसाहेब आंबरे हे वीरगाव येथील सबस्टेशन येथे कार्यरत होते. ते आज वीरगाव परिसरातील एका विजेच्या खांबावर वीज दुरुस्थसाठी चढले असता त्यांचा खांबावरून कोसळून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यात दगड घुसल्याने जागीच गतप्राण झाले. भाऊसाहेब आंबरे यांना विजेच्या खांबावर चढले असता विजेची धक्का लागला असल्याची चर्चा समोर येत आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्याचे काम सुरु होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने गणोरे व वीरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Wireman died on the spot after falling from an electric pole

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here