Home Maharashtra News आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना घृणास्पद,  पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि...

आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना घृणास्पद,  पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

rape of an eight-year-old girl is disgusting

Beed News:  बीड मधील अंबाजोगाई येथील ८ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची (Rape) घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद असून यातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी आणि तपासात संपूर्ण गुप्तता पाळून  या प्रकरणाचा वेगाने तपास करावा, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी नुकतीच पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. 

आंबाजोगाई येथील आठ वर्षीय बालिकेला गावातीलच किरण रामभाऊ शेरेकर (वय, 23) याने 19 मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. या अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेने पीडित मुलगी आणि तिचे आई- वडील प्रचंड तणावाखाली आहेत.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक केली आहे. परंतु, आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, घटनेचा संपूर्ण गुप्तता पाळून वेगाने तपास करावा आणि आरोपीस कडक शिक्षा करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, पीडित मुलीच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: rape of an eight-year-old girl is disgusting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here