Home अकोले रविना टंडनला डॉ. अजित नवले यांनी खडेबोल सुनावले अकोले

रविना टंडनला डॉ. अजित नवले यांनी खडेबोल सुनावले अकोले

रविना टंडनला डॉ. अजित नवले यांनी खडेबोल सुनावले अकोले 

प्रतिनिधी: तनवी गुंजाळ 

शेतकरी आंदोलनाच्या आजच्या पाचव्या दिवशी मार्क्सवादी किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना डाळ, साखर, दुध भेट देण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  तहसीलदारांना दिलेल्या भेटवस्तू मुख्यमंत्री महोदायांपर्यंत पोहोचावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती. संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दुधाला योग्य भाव दोन दिवसांत योग्य निर्णय नाही झाल्यास शहरात होणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा तोडू असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला.

 तसेच अजित नवले यांनी अभिनेत्री रविना टंडन यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. रविना टंडन यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना विना जामीन अटक करा अशी भूमिका घेतलेली आहे.

पांढरपेशा लोकांनी मध्यमवर्गीय लोकांकडे पाहण्याची जी भूमिका आहे याचे प्रतिनिधींत्व त्यांनी केलंय. लाज वाटावी अशा प्रकारची रविना टंडन ची प्रतिक्रिया आहे. शेतकरी माय मावल्या ज्यांच्या नखाची सालट संपलेलीत, ज्या आमच्या आई बहिणी गोठ्यांमध्ये काम करतात त्यांच्या अंगाला गाईच्या शेणाचा आणि गोमुत्राचा वास आयुष्यभर सुटत नाही, परफुम लावून पंचतारांकित हॉटेलमध्ये या शेतकरी माय मावल्यांबाबत उद्गार काढणे रविनाताई तुम्हाला शोभत नाही अशा प्रकारच्या भावना आमच्या माय मावल्या व्यक्त करतात.

शरम असेल तर, अन्नाला जागणार असाल तर माफी मागा अशा प्रकारच्या भावना माय मावल्या व्यक्त करतात.

आमच्या शेतीमालाच नुकसान जे झाले त्याच्या वेदना तुम्हाला झाल्या पण भाव मिळाला नाही म्हणून दररोज टोमाटो चे ढीग बांधावर आम्हाला सडवावे लागतात, उभ्या वांग्याच्या पिकामध्ये नांगर घालावा लागतो, उभ्या कांद्याचे पिक रस्त्यावर फेकून द्यावे लागते आम्ही फेकून दिलेले तेही अन्नच असते ते नुकसान तुम्हाला दिसत नाही, त्या आमच्या वेदना दिसत नाही. पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून त्या प्रकारच्या कमेंट करण सोपं असत, ताई ! रानात राबन काय असत हे एकदा येऊन पहा. आमच आवाहन आहे कि एकदा तरी आमच्या आई बरोबर येऊन खुरपा मग वेदना कळतील, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही अशा शब्दात डॉ. अजित नवले यांनी रविना टंडन यांना सुनावले.

ad Sangamner Akole News


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


See: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here