महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या
अहमदनगर: महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्यावर सोमवारी रात्री नगर पुणे महामार्गावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी दिलेल्या माहितीनुसार जरे या कारने पुण्यातून नगरला येत होत्या, शिरूर व सुपा दरम्यान असलेल्या जातेगाव फाट्यावर त्यांचे वाहन दुचाकीस्वारांनी अडविले. तुमच्या वाहनाचा मिरर आम्हाला लागला असे म्हणून त्यांनी जरे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यातील एकाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. जरे यांच्यासोबत त्यांची आई व छोटा मुलगा होता. जरे यांना तातडीने वाहनाने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा नगरच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविचेदनासाठी आणण्यात आला होता. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. हल्ला नेमकी कोणत्या कारणामुळे हे अद्याप समजू शकले नाही. जरे यांच्यासोबत असलेल्या आई व मुलगा यांच्याकडून माहिती घेत आहेत.
Web Title: Rekha Jare Murder