Home अहमदनगर रेखा जरे यांची हत्या सुपारी देवूनच: तीन आरोपींना अटक

रेखा जरे यांची हत्या सुपारी देवूनच: तीन आरोपींना अटक

Rekha Jare was killed by betel nut

अहमदनगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातील दोघांना तर कोल्हापूर येथून एकास अटक केली आहे.

या अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन कोल्हार येथील तर एक केडगाव येथील आहेत. सुपारी देऊनच रेखा जरे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मुख्य सुत्रदार हा नगर शहरातील असल्याचे प्रथमदर्शी समजते.

सोमवारी रात्री नगर पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ ता. पारनेर   रेखा  जरे यांचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली होती. सोशियल मेडीयावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी श्रीरामपूर व राहता येथे शोध घेतला. दोघे कोल्हार परिसरात लपून बसले होते त्यांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार  झाला होता. पोलीस आरोपींकडून चौकशी करत आहेत.  

Web Title: Rekha Jare was killed by betel nut

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here