Bribe: महसूल सहायक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Ahmednagar | अहमदनगर: अकृषिक परवानगीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोघांकडून चार हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील महसूल सहायकास रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. मंगेश विजय ढुमणे (वय 41 रा. गणेश चौक, सिव्हिल हाडको, अहमदनगर) असे पकडलेल्या महसुल सहायकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक गाहिनीनाथ गमे, पोलीस अंमलादार रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील तक्रारदार यांनी त्यांच्या गावामध्ये आईचे नावे घेतलेल्या जमिनीचे अकृषिक परवानगी करिता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाकडे प्रकरण दाखल केले होते. सदर नाहरकत प्रमाणपत्र दिले म्हणून ढुमणे याने तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रूपयांची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांचे निघोज (ता. पारनेर) गावातील मित्र यांनी सुध्दा अकृषिक परवानगी करिता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. ते प्रमाणपत्र देण्याकरिताही ढुमणे यांनी तीन हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने 1 जुलै रोजी लाच मागणी पडताळीचा सापळा लावला. ढुमणे यांनी पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित मिळुन चार हजार रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले. सोमवार, 4 जुलै रोजी ढुमणे विरोधात लाचेचा सापळा आयोजित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूसंपादन विभागाचे समोरील मोकळ्या व्हरांड्यात ढुमणे याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची (Bribe) रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
Web Title: Revenue Assistant caught taking bribe while caught by Bribery Prevention Department