Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

Pathardi Two brothers drowned in a lake

Pathardi | पाथर्डी: दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी (Karanji) येथे घडली . या घटनेने करंजी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करंजी येथील संदीप दत्तात्रय अकोलकर (वय 28) व बाप्पू दत्तात्रय अकोलकर (वय-22) हे दोघे सख्खे भाऊ सोमवारी सकाळी करंजी येथील मुखेकरवस्ती जवळील बोरुडेचा पाझर तलाव या ठिकाणी मेंढरं धुण्यासाठी गेले असताना यातील एकाचा मेंढरं धूत असतांना पाय घसरल्याने तो डोहात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ बापू देखील मदतीला धावला असता दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व पोहोता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

काही वेळाने मेंढर आहेत परंतु त्या सोबतची दोन तरुण मुलं कुठे आहेत. याबाबत आजूबाजूच्या लोकांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही शेतकर्‍यांनी त्या डोहाजवळ येऊन पाहिले असता हे दोघे पाण्यात बुडाल्याचा अंदाज आल्याने काही तरुणांनी पाण्यात शोध घेऊन मृतदेह (Dead bodie) बाहेर काढले. पाथर्डी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करंजीसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pathardi Two brothers drowned in a lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here