Home महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी या नेत्याची निवड

विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी या नेत्याची निवड

Election of Ajit Pawar as Leader of Opposition in the Legislative Assembly

मुंबई: विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज सोमवारी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पवार यांचे अभिंनदन करून शुभेच्छा दिल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Election of Ajit Pawar as Leader of Opposition in the Legislative Assembly

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here