Home संगमनेर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निषेधार्थ संगमनेरात जनआक्रोश मोर्चा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निषेधार्थ संगमनेरात जनआक्रोश मोर्चा

Sangamner news: राज्य सरकारने गौण खनिजावर बंदी, मोर्चामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजाराच्या संख्येने बांधकाम कामगार ठेकेदार स्टोन क्रेशर चालक असे अनेक बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले महिला आणि नागरिक सहभागी.

Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil, Janakrosh Morcha

संगमनेर : राज्य सरकारने गौण खनिजावर बंदी आणल्यामुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निषेधार्थ संगमनेर येथे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या कामगारांनी प्रांताधिकारी कार्यालय हजारोच्या संख्येने आपणास मोर्चा येऊन धडकला. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणावरून सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान महाआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली

यशोधन कार्यालय नाशिक रोड बस स्थानक मार्गे हा मोर्चा संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन प्रांत अधिकारी कार्यालयाचा परिसर तणाव सोडला होता. या मोर्चामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजाराच्या संख्येने बांधकाम कामगार ठेकेदार स्टोन क्रेशर चालक असे अनेक बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी व ठेकेदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये त्या कारवानी नदीपात्रातून वाळू वाहतूक केली जाते ते गाढवे सुद्धा या मोर्चात गाढवावरून वाळूची वाहतूक करणारे कर्मचारी घेऊन आल्याने सर्वजण अवाक झाले होते.

Web Title: Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil, Janakrosh Morcha

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here