Jamkhed Suicide Case: विद्यार्थिनीने गुरुवारी आत्महत्या केल्यानंतर तिच्या प्रियकरानेही नागपूर येथे आत्महत्या केल्याचे समोर आले.
जामखेड : येथील मेडिकल कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या व मूळची नागपूर येथील असलेल्या विद्यार्थिनीने गुरुवारी आत्महत्या केल्यानंतर तिच्या प्रियकरानेही नागपूर येथे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मयत मुलीची आई व भाऊ जामखेड येथे आले असता त्यांना मयत डिंपल गणेश पाटील हिचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील मुकुंद जवकर यांच्या इमारतीत भाडे तत्वावर रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली राहत आहेत. त्यामध्ये डिंपल गणेश पाटील राहत होती. तिने गुरुवारी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.
डिंपल ही मूळची नागपूर येथील रहिवासी असून तिने नुकतेच बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षीची परीक्षा दिली होती. डिंपल हिचे नागपूर येथे इंजिनियर झालेला निखिल अण्णा गजभिये याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. तो मयत मुलीच्या सावत्र आईचा मामेभाऊ होता. डिंपल हिने आत्महत्या केल्याचे बातमी समजताच तिचा प्रियकर निखील यानेही आत्महत्या केली.
या घटनेनंतर मयत मुलीची आई ज्योत्स्ना गणेश पाटील व भाऊ प्रथम पाटील जामखेड येथे आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात मृतदेह दिला. मूळगावी नागपूर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तिच्या नातेवाईक यांनी दिली.
कॉलेजच्या बाहेरील घटना….
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अॅण्ड रिसर्च संस्थेची विद्यार्थ्यांबाबत कडक शिस्त आहे. कॉलेजमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. तेथे १ हजार २०० मुले-मुली शिक्षण घेत असून कॉलेजच्या इमारतीच्या बाहेर व आवारात पहारेकरी असतात. तेथे आजपर्यंत कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. याबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी दक्षता घेतल्याने कॉलेज नावारूपाला आले आहे. परंतु, कॉलेजच्या बाहेर घटना घडली असल्याने ते काही करू शकत नाहीत, असे कॉलेज प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Web Title: After the suicide of the medical student, the boyfriend also committed suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App