ब्रेकिंग: शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या गाडीला भीषण अपघात
Accident News: आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत भीषण अपघात.
कशेडी: शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत भीषण अपघात (Accident) झाला आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमी चालकावर चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात आमदार योगेश कदम उपस्थित आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणा-या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली .यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: MLA Yogesh Kadam car from the Shinde group met with a terrible accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App