Home नाशिक सिन्नर: धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट, चालकाने घेतली बाहेर उडी अन…

सिन्नर: धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट, चालकाने घेतली बाहेर उडी अन…

Sinner: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ धावत्या ट्रकने अचानक पेट (Fire) घेतल्याची घटना.

running truck suddenly caught fire

सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेली माहिती अशी की, शिर्डीकडून सिन्नरकडे आयशर ट्रक क्रमांक (एमएच ०४ एल.ई. ९४१४) जात असताना ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी आगीत आयशर ट्रकची पुढची बाजू पूर्णपणे जळून खाक झाली. तर चालकाने ट्रक थांबवून तात्काळ ट्रकच्या बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला असून ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे चालकाचे म्हणणे आहे.

दरम्यान, यावेळी नॅशनल हायवेचे टोल नाक्यावरील आपत्कालीनचे सुपरवायझर प्रशांत शिंदे व त्यांचे सहकारी दुर्गेश शिंदे, योगेश शिंदे यांना आयशर ट्रकला आग (Fire) लागल्याचे समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पाण्याचा टँकर बोलावून आग विझवण्यास मदत केली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: running truck suddenly caught fire

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here