Home क्राईम नको त्या अवस्थेत पत्नीचे प्रियकरासोबत फोटो पाहून पतीची आत्महत्या

नको त्या अवस्थेत पत्नीचे प्रियकरासोबत फोटो पाहून पतीची आत्महत्या

पत्नीसोबत नको त्या अवस्थेत असलेले फोटो पाहून पतीला धक्का बसला आणि गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

Husband commits suicide after seeing his wife's photo with her lover in an unwanted state

यवतमाळ: पत्नीसोबत नको त्या अवस्थेत असलेले फोटो प्रियकराने तिच्या पतीला शेअर केले. है पाहून त्या पतीला धक्का बसला. त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तपास नेर पोलिसांनी केला असून ज्यातून हे सत्य समोर आले आहे. या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

अजय रामराव हातागळे (२७) या तरुणाने २६ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. नंतर अजयच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. पत्नीच्या प्रियकराने अजयला नको त्या अवस्थेतील फोटो मोबाइलवर सेंड केले. गावातीलच शैलेश संतोष शेलोकार याचे मृताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.

यापूर्वीही त्यांना एकदा नको त्या अवस्थेत बघण्यात आले. मात्र तरीही सुधारणा झाली नाही. यातूनच अजयची मानसिकता बिघडली व त्याने आत्महत्या केली, अशी तक्रार अजयचे वडील रामराव हातागळे यांनी दिली. त्यावरून नेर पोलिसांनी आरोपी शैलेश शेलोकार याच्याविरुद्ध कलम ३०६ भादंविनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास नेर ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीपक बदरते, गजानन पत्रे करीत आहे.

Web Title: Husband commits suicide after seeing his wife’s photo with her lover in an unwanted state

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here