Home संगमनेर संगमनेर: घर फोडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली

संगमनेर: घर फोडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली

संगमनेरात छगन भुजबळ यांनी शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टीका केली आहे. घरं फोडण्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. सहानुभूती कायमची नसते असेही त्यांनी म्हंटले आहे.

Sharad Pawar started breaking the house

संगमनेर: पावसात भिजून सहानुभूती मिळवणार्‍या शरद पवार यांनीच घरं फोडण्याची सुरुवात केली, अशी टीका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी संगमनेर  येथे केली.

नाशिक हुन पुण्याकडे  जाताना मंत्री भुजबळ  यांचे तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे काही वेळ थांबले होते. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांमधून सामाजिक कार्याची दिशा मिळते, त्यामुळे सकाळी या दोन्ही ठिकाणी जावून आता आपण पुण्याकडे जात असल्याचे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्ष आपल्या सत्तेसाठी दुसर्‍यांचे घर फोडीत असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला होता. याबाबत विचारले असता घरे फोडण्याची सुरुवात पवार कुटुंबीयांनी केली असा आरोप त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला. पावसात भिजून काही काळ सहानुभूती मिळते मात्र ही सहानुभूती कायमस्वरूपी नसते असेही भुजबळ म्हणाले. याप्रसंगी समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar started breaking the house

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here