Home अकोले अकोलेतील घटना: अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून, महिलेसह तिघांवर गुन्हा

अकोलेतील घटना: अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून, महिलेसह तिघांवर गुन्हा

Akole News: विवाहबाह्य अनैतिक संबंधातून ३० वर्षीय विवाहित तरुणाचा गळा दाबून खून (Murder) केल्याची घटना. (Ahmednagar News)

Murder of youth due to immoral relationship, crime against three including a woman

अकोले: अकोले तालुक्यातील सातेवाडी येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहबाह्य अनैतिक संबंधातून ३० वर्षीय विवाहित तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळीबा पांडुरंग दिघे (रा. सातेवाडी), संपत बारकू मुठे (रा. मुठेवाडी) व अन्य एक महिला या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ३ जुलै २०२३ रोजी उमेश कुशाबा मुठे (वय ३० रा. सातेवाडी) हा दुकानमाळ वस्ती परिसरात शेतबांधाच्या कडेला मृतदेह आढळून आला होता. मयत उमेश यांची आई सावित्रीबाई कुशाबा मुठे (वय ५५) यांनी फिर्याद दिली असून माहितीनुसार, मयत उमेश हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे एका महिलेशी दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. तो कधी- कधी रात्री आरोपीच्या घरीच थांबत असे. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी २ जुलैला कामानिमित्त उमेश घराबाहेर पडला. मात्र, रात्री घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी ३ जुलैला दुकानमाळ वस्ती परिसरात उमेश मृतावस्थेत आढळून आला. उमेश याचा गळा दाबून खून झाल्याची तक्रार मयताची आई व पत्नी, नातेवाईक यांनी केली होती. वैद्यकीय अहवालानंतर सोमवारी रात्री उशिरा अकोले पोलिसांत तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Murder of youth due to immoral relationship, crime against three including a woman

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here