Home संगमनेर संगमनेर: तरुणाचा खून केल्या प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

संगमनेर: तरुणाचा खून केल्या प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

Sanagmner imprisonment for murder youth

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सोमनाथ सोपान बढे वय २४ या तरुणाचा सहा वर्षापूर्वी खून (Murder) करण्यात आला होता.

या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस समीर चांदभाई पठाण यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

मेंढवण येथील चंद्रकांत सोपान बढे वय ३२ याची पत्नी हिचे घराशेजारी राहणाऱ्या समीर चांदभाई पठाण वय २३ याच्याशी अनैतिक संबंध होते. हा प्रकार समजताच चंद्रकांत बढे याने पत्नीला समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपी समीर पठाण याच्या आई वडिलांना ही माहिती समाजाविण्यास सांगितले. मात्र या दोघांच्या अनैतिक संबंधात काहीही फरक पडला नाही.

१० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी चंद्रकांत बढे याने भाऊ सोमनाथ सोपान बढे यास हा प्रकार सांगून मेंढवण येथे बोलावून घेतले. त्यावेळी समीर पठाण व त्याचा भाऊ अकबर पठाण यांच्यात वादावादी झाली. याचा राग येऊन समीर पठाण याने सोमनाथ बढे याच्यावर चाकूने वार करत खून केला. याप्रकरणी चंद्रकांत बढे समीर चांदभाई पठाण व अकबर चांदभाई पठाण यांच्याविरुद्ध  फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, या खटल्यात सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी काम पाहिले. याप्रकरणातील आरोपीचा भाऊ अकबर व फिर्यादीची पत्नी यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.

Web Title: Sanagmner imprisonment for murder youth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here