संगमनेर तालुक्यात दरोडेखोरांनी प्रवाशांना भर रस्त्यात लुटले, लाखोंचा मुद्देमाल घेऊन पसार
संगमनेर | Sangamner: तालुक्यातील कौठे कमळेश्वर ते निळवंडे रस्ता मालढोन गावाच्या शिवारात शिर्डीहून साईंचे दर्शन घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना दरोडेखोरांनी अडवून त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून, त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांचे तोंड बांधून रस्त्याच्या कडेला फेकून देत दरोडेखोरांनी गाडी व मोबाईल लुटून नेल्याची घटना शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी घडली.
याप्रकरणी अतुल नाथ मिंढे यांनी सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तो शून्य क्रमांकाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल नाथ मिंढे रा. खेड जि. पुणे यांच्या एम.एच. १०४ जीएच ८२०७ या क्रमांकाच्या प्रवासी ववाहनातून ६ फेब्रुवारी रोजी पाच व्यक्तींना घेऊन पुणे ते शिर्डी असा प्रवास केला. त्यानंतर ते नाशिकला निघाले होते. त्यावेळी ते पुणे नाशिक फाटा ते कौठे कमळेश्वर निळवंडे रस्ता ते सिन्नर तालुक्यातील मालढोन गावाच्या शिवारातरात्रीच्या सुमारास गाडीला दरोडेखोरांनी हात केला. त्यामुळे चालकाने गाडी थांबविली. आणि दरोडे काही क्षणात गाडीत चढले/ गाडीतील प्रवाशांनी त्यांचा प्रतिकार केला असता त्यांनी थेट पिस्तुल काढला आणि मस्तकावर लावला. त्याननंतर सराईत दरोडेखोरांनी प्रवाशांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. प्रवाशाकडे असणारे साहित्य या दरोडेखोरांनी काढून घेतले. या पाचही प्रवाशांच्या तोंडाला चीगट टेप गुंडाळून तोंड बंद केली. त्यांना बांधून रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. त्यांच्याकडील १० लाख रुपयांची गाडी व मोबाईल असा मुद्देमाल घेऊन फरार झाले.
Web Title: Sangamner robbers robbed the passengers on the road