Home अहमदनगर वाळूतस्करांची मुजोरी: तलाठ्यावर प्राणघातक हल्ला

वाळूतस्करांची मुजोरी: तलाठ्यावर प्राणघातक हल्ला

Sand smugglers Deadly attack on the lake

Ahmednagar | Shevgaon | शेवगाव: तालुक्यातील बालमटाकळी येथे अवैध वाळू उपसा करणारा ट्रक्टर पकडून कारवाईसाठी शेवगाव तहसील कार्यालय येथे घेऊन जात असताना वाळूतस्करांनी (Sand smugglers ) तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

बी. जे. अंधारे (तलाठी बालमटाकळी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. बालमटाकळीचे तलाठी बी.जे. अंधारे यांनी गुरुवारी सकाळी अनधिकृत वाळू वाहतूक करणारा एक ट्रक्टर पकडला. तो ट्रक्टर ते कारवाईसाठी शेवगाव तहसील कार्यालय येथे घेऊन जात होते. त्याचवेळी शेवगाव बोधेगाव रस्त्यावर सोनविहीर फाट्यानजीक तिघा वाळू तस्करांनी अंधारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंधारे यांच्यावर ग्रामीण रुग्नालयात प्राथमिक उपचार करून अहमदनगर येथील रुग्णात हलविण्यात आले. घटनास्थळावरून तिघा हल्लेखोर वाळू तस्करांनी वाळूचा ट्रक्टर पळवून नेला. या घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी धाव घेत तलाठी बाबसाहेब अंधारे यांची  विचारपूस केली.

Web Title: Sand smugglers Deadly attack on the lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here