Home संगमनेर संगमनेर तालुक्यात रस्त्यावर मोठा वटवृक्ष कोसळला, वाहतुकीस अडथळा  

संगमनेर तालुक्यात रस्त्यावर मोठा वटवृक्ष कोसळला, वाहतुकीस अडथळा  

Sangamner Accident arge banyan tree collapsed on the road

संगमनेर | Accident: संगमनेर  तालुक्यातील निमोण  येथील ओढ्यातील डांबरी रस्त्यावर मोठा वटवृक्ष  कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी ( दि. १० ) दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे  मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर ही वटवृक्ष कोसळण्याची घटना घडली.

डांबरी रस्त्यावरच वटवृक्ष कोसळल्याने लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

सुदैवाने वटवृक्ष रस्त्यावर कोसळला त्याचवेळी दुचाकी, चारचाकी वाहन अथवा कुणी या रस्त्यावरून प्रवास करीत नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

निमोण येथे ओढ्यातील डांबरी रस्त्याच्या कडेला मोठे वटवृक्ष आहेत. अनेक वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार असणारे त्यातील एका वटवृक्ष रविवारी दुपारी डांबरी रस्त्यावर कोसळला.

वटवृक्ष रस्त्यावर कोसळल्याचे समजताच अनेक ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. सदर वटवृक्ष रत्याच्याबा जूला घेण्याचे काम सायंकाळी सुरु होते.

Web Title: Sangamner Accident arge banyan tree collapsed on the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here