Home Accident News Accident संगमनेर: कर्हे घाटाजवळ बस पलटी, चार जण जखमी

Accident संगमनेर: कर्हे घाटाजवळ बस पलटी, चार जण जखमी

Sangamner Accident bus overturned near karhe Ghat

संगमनेर | Accident: ट्रॅव्हल बस चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर आज शुक्रवारी बस रस्त्याच्या कडेला १० ते १२ फुट खड्यात पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चार जण जखमी झाले. इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पहाटेच्या सुमारास कर्हे घाटाजवळ हॉटेल कृष्णा गार्डन जवळ घडला.

नाशिकवरून ट्रॅव्हल बस क्रमांक एम.एच. ०४ ७८६५ प्रवाशी घेऊन संगमनेरच्या दिशेने जात होती. चालक शिवदास भिकाजी आव्हाड यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्यात पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

या अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन शिंदे, ओंकार शेंगाळे, अनिल जाधव, विष्णू आहेर हे घटना स्थळी दाखल झाले. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. जखमी झालेल्या चार जणांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Sangamner Accident bus overturned near karhe Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here