संगमनेरात महिलेच्या गळ्यातील सात तोळ्याचे गंठण धूमस्टाईने पळविले
संगमनेर | Sangamner News: संगमनेर शहरातील गणेशनगर येथील महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सुमारे ७ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण धूमस्टाईलने ओरबाडल्याची घटना स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. यामुळे संगमनेरात चोरीचे सत्र सुरूच आहे. तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेशनगर येथील शकुंतला ज्ञानदेव पालवे वय ६५ ही वृद्ध महिला अकोले बाह्यवळण मार्गावर स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ उभी असताना पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे गंठण ओरबाडून लांबविले. यानंतर शाकुंतला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षिका कोकाटे या करत आहे.
Web Title: Sangamner News woman’s neck was snatched by the fog