संगमनेर: मालवाहू ट्रकने लिंबाच्या झाडाला धडक दिल्याने उलटला
संगमनेर | Accident: कोल्हेवाडी फाट्यानजीक मालवाहू ट्रकची लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) चालक गंभीर जखमी झाला आहे. तर नजीक असलेले हॉटेल विसावा थोडक्यात बचावले.
वडगावपान मार्गे असलेल्या संगमनेर ते लोणी रस्त्यावरील कोल्हेवाडी फाट्यानजीक रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली. मालवाहू ट्रकने लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने सदर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. सदर मालवाहू ट्रक धुळे येथून पुण्याच्या दिशेने जात होता. जखमी मालवाहू ट्रक चालकाला तातडीने संगमनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. ट्रकने लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये जर लिंबाचे झाड आले नसते तर मालवाहू ट्रक थेट विसावा हॉटेलवर धडकला असता. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सदर अपघाताची घटना बघण्यासाठी रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.
Web Title: Sangamner Accident truck overturned after hitting a lemon tree