Omicron: देशात इतक्या जणांना ओमायक्राॅनची बाधा
Omicron: देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर पोहोचली असून १३० जण बरे झाले. या विषाणूने १७ राज्यांत विळखा घातला आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो.
राज्यात रविवारी करोनाचे १६४८ रुग्ण आढळले असून, आणखी ३१ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल़े. गेल्या २४ तासांत देशात ६९८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात १६४८ जणांना कोरोनाची लागण झाली असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले असताना रुग्णवाढ सुरूच आह़े त्यामुळे संपूर्ण जगामध्ये ओमयक्राॅन किती धोकादायक ठरू शकतो यावर उपाययोजना करण्यासाठी विचारमंथन सुरु झाले आहे.
Web Title: People in the country are affected by Omicron