Home क्राईम संगमनेर: अंगातील भूत काढून देतो असे सांगून भोंदूबाबाने केला विवाहितेवर बलात्कार

संगमनेर: अंगातील भूत काढून देतो असे सांगून भोंदूबाबाने केला विवाहितेवर बलात्कार

Sangamner Bhondubaba rape married woman

संगमनेर | Rape: तालुक्यातील पारेगाव येथील २३ एप्रिल रोजी घडलेली घटना उघडकीस आली आहे. अंगातील भूत काढून देतो असे सांगून एका भोंदूबाबाने विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना २३ एप्रिलला घडली आहे. या पिडीत महिलेने सोमवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

सावित्रा बाबुराव गडाख वय ५५ असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील एका ४५ वर्षीय महिलेला बऱ्याच शारीरिक व्याधी होत्या. उपचार करूनही तिला बरे वाटत नव्हते.

संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या तिच्या नात्यातील सावित्रा बाबुराव गडाख या भोंदूबाबाकडे उपचारासाठी नेले. भोंदूबाबा हा मंत्र टाकून लिंबू देऊन लोकांना बरे करतो, त्याच्या अंगात हवा येते. यावर विश्वास ठेवून महिलेने आपल्या व्याधी सावित्रा गडाखला सांगितल्या. त्यावर त्याने ताईत दिला होता. तुझ्या अंगात भूत बाधा झाली आहे ती काढावी लागेल असे त्याने सांगितले. त्यानुसार आपल्या पतीला बरोबर घेऊन भोंदूबाबाकडे गेली. व तिला जबरदस्तीने मद्य पाजून शेतात तिच्यावर अत्याचार केला. विवाहित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पतीला काही दिवसांनी अत्याचारबाबत सांगितले. सोमवारी याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संगमनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.  

Web Title: Sangamner Bhondubaba rape married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here