अकोले अगस्ती कारखान्याचे संचालक भास्करराव घुले यांचा राजीनामा मंजूर करू नये
अकोले | Akole Agasti Karkhana: अगस्तीच्या कारभाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांचा राजीनामा मंजूर करू नये अशी मागणी शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केली आहे. गैरव्यवहार व कारभारामुळे अगस्ती साखर कारखाना मोडीत निघू नये म्हणून सभासद या नात्याने आमची धडपड आहे.
अगस्तीचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले राजीनामा देत असल्याचे वार्ता समजताच सोमवारी सावंत यांनी पत्रकारपरिषद घेऊन भूमिका मांडली आहे. यावेळी बी. जे. देशमुख, सुभाष येवले, आनंद वाकचौरे, कैलास शेळके आदी उपस्थित होते. या गळीत हंगामातील पूर्ण देणी देईपर्यंत तसेच सभासदांच्या शंकाचे निरसन व गैरकाराभारची चौकशी होईपर्यंत संचालक घुले राजीनाम्याला मंजुरी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
अगस्तीचे या गळीत हंगामातील उस उत्पादकांचे ३४ कोटी व तोडणी कामगारांचे ७ कोटी देणे असून साखर कामगारांचे ३ महिन्याचे पगार थकले आहेत. लोन फेडणे अजून बाकी आहे. इथेनॉल प्रकल्पासाठी काढलेले १५ कोटी कर्ज तसेच आहे. ही सर्व देणी देऊन पुन्हा कारखाना सुरु करण्यासाठी पैसे कसे उपलब्ध होणार असा प्रश्न बी.जे. देशमुख यांनी केला आहे.
Web Title: Akole Agasti karkhana resignation of Bhaskarrao Ghule