Home महाराष्ट्र राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक, राजेश टोपेंचे संकेत

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक, राजेश टोपेंचे संकेत

Break vaccination for 18 to 44 year olds in Maharashtra Rajesh Tope

मुंबई: राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्शभूमीवर प्रदुर्भावास आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. आत्तापर्यंत राज्यात १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ४५ वयोगटातील लोकांसाठी फक्त ३५ हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्यसरकारकडून १८ ते १४ वयोगटासाठी खरेदी करण्यात आलेले ३ लाख डोस ४५ वर्षावरील लोकांना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. टोपे म्हणाले राज्यातील ४५ वर्षावरील लोकांना लसीचा दुसरा डोस देणे महत्वाचे आहे. सध्या ५ लाख लोकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. केंद्राकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्यानी बऱ्याच ठिकाणी लसीकरण बंद झाले आहे. केंद्रसरकारकडून १६ लाख डोस येणे बाकी आहे. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारने खरेदी केलेले ३ लक्ष डोस आता ४५ वर्षावरील व्यक्तींना दिले जाणार आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण थांबविण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ब्रेक लावावा का? याबाबत बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल.   

Web Title: Break vaccination for 18 to 44 year olds in Maharashtra Rajesh Tope

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here