Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध असूनही रुग्णवाढ थांबेना, जिल्हाधिकार्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध असूनही रुग्णवाढ थांबेना, जिल्हाधिकार्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Ahmednagar Corona important Decision 

अहमदनगर | Ahmednagar Corona: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा प्रशासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात रुग्णवाढ कमी होताना दिसत नाही. मुंबईपेक्षा अधिक अडचणीत अहमदनगर जिल्हा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यंत्रणा अधिक  गतिमान केली आहे. जिल्ह्यासाठी आणखी ५० हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट्स प्राप्त झाले असून चाचण्यांची गती आता वाढविण्यात येणार आहे.   

  • जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्यात भर दिला आहे.
  • करोना सदृश लक्षणे असणारे रुग्ण खासगी रुग्णालयात, एक्स रे काढण्यासाठी, सीटी स्कॅनसाठी परस्पर आले असता त्यांच्या नोंदी ठेवून प्रशासनास कळविण्याचे बंधन खासगी डॉक्टरांना घातले आहे.
  • औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरोनावरील औषधे देऊ नयेत व त्या रुग्णांच्या नोंदी ठेवाव्यात असा आदेश देण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Corona important Decision 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here