Home संगमनेर संगमनेर: प्रवरा नदीपात्रात बुडालेला त्या मुलाचा मृतदेह सापडला

संगमनेर: प्रवरा नदीपात्रात बुडालेला त्या मुलाचा मृतदेह सापडला

Sangamner body of the boy was found drowned in the Pravara river 

संगमनेर | Sangamner: संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी एक मुलगा बुडून गेल्याची घटना घडली होती. या घटनेत यश कृष्णा आडेप वय १२ रा. पदमानगर याचा मृत्यू झाला आहे.

प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या यश आडेप या मुलाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर आज गुरुवारी सकाळी खराडीनजीक तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने यश याला पाण्यातून बाहेर काढत मृतदेह शावविचेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान मंगळवारी सर्व मित्र पाण्यात पोहोत असताना यामधील यश आडेप हा अचानक पाण्यात बुडाला.तो पाण्यात बुडाल्याने मुलांनी आरडाओरडा केला. यावेळी सोबत असलेल्या ऋषिकेश मोहन याने यशाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पात्रात जास्त पाणी असल्याने यश हा वाहून गेला. ही माहिती समजताच अनेक नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र तो कोठेही आढळून आला नाही. या घटनेला तब्बल ४० तास झाल्यानंतर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास खराडीनजीक त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविचेदन करण्यासाठी कुटीर रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेने नातेवाईक व मित्र यांच्या शोक व्यक्त होत आहे.  

Web Title: Sangamner body of the boy was found drowned in the Pravara river 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here