पत्नीवर अंगावर अॅसिड हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्ष सक्तमजुरी
अहमदनगर | Ahmednagar: दोघा पती पत्नीचे पटत नसल्यामुळे वेगळे राहणाऱ्या पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकून ठार मारण्याच्या प्रयत्न केल्या केल्याप्रकरणी गुन्ह्यात पतीला १० वर्ष सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड सुनाविण्यात आला आहे.
नगर शहरातील आलमगीर येथे २०१७ मध्ये ही घटना घडली होती. यांमधील आरोपी श्रीकांत आनंदा मोरे रा. आलमगीर भिंगार याला शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
यातील फिर्यादी महिलेचे २००८ मध्ये आरोपी मोरे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत, मात्र दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने या त्रासाला कंटाळून ती महिला पतीला सोडून आपल्या आईच्या घरी राहायला गेली. मुलेही तिच्या सोबत राहत होती. तेथील जिल्हा परिषद शाळेत मुले शिकत होती. ३ ऑगस्ट २०१७ रोजी एका शिक्षकासोबत मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावरच आरोपी मोरे आडवा झाला. त्याने दुचाकी थांबवून शिक्षकाला निघून जाण्यास सांगितले. त्यांनतर पत्नीसोबत काही अंतर बोलत पायी निघाला. थोडे अंतर जाताच खिशातून अॅसिडची बाटली काढली व तिच्या अंगावर फेकले. अॅसिडमुळे ती होरपळून निघाली. त्यातच वेदना होत असताना ती काही वेळ रस्त्यावरच पडून राहिली. हा प्रकार जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी तिचा जबाब घेतला. तिने सर्व हकीकत सांगून पतीविरुद्ध तक्रार केली. उपचार केल्यानंतर जीव वाचला मात्र जखमा कायम राहिल्या. पोलीस निरीक्षक एस.पी, कवडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील मनीषा शिंदे यांनी बाजू मांडली.
Web Title: Ahmednagar Husband who attacked his wife with acid