संगमनेरात करोनाचा धुमाकूळ: आज सोमवारी ३० करोनाबाधित
संगमनेर(Sangamner): संगमनेर तालुक्यात करोनाने धुमाकूळ घातला आहे. आज सोमवारी दुपारी सहा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. यात रॅपिड अँटीजन व खासगी अहवाल प्राप्त झाले आहेत. आज एकाच दिवशी ३० करोनांबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालात गोल्डन सिटी येथे ३७ वर्षीय तरुण, खंडोबागल्ली परिसरात ३६ वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे ३५ वर्षीय तरुण, व २ वर्षीय बालक, राजापूर येथे १७ वर्षीय तरुणी, कसारा दुमाला येथील ७७ वर्षीय वृद्धाला करोनाची लागण झाली आहे.
आज सायंकाळी प्राप्त अहवालात २४ जण यामध्ये शहरात ५५, ५४, ५७, ५२, ५५, ४२, ६०,३८, ४१ वर्षीय पुरुष तर ५२,३८,३२ वर्षीय महिला असे १२ करोनाबाधित आढळून आले आहेत.(परिसरातील नावे अजून प्राप्त झालेली नाहीत)
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील ४८ वर्षीय दोन पुरुष, ४३, ७५, ५३ वर्षीय महिला आढळून आले आहेत. निमगाव जाळी येथे ३० वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथे ४३ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ९ वर्षीय बालक व १७ वर्षीय तरुण, अंभोरे येथे ३० वर्षीय तरुण, शिबलापूर येथे २६ वर्षीय तरुण असे २४ रुग्ण आढळून आले आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner corona 30 infected today