Home संगमनेर संगमनेर: जमावाची दगडफेक करून तरुणास मारहाण

संगमनेर: जमावाची दगडफेक करून तरुणास मारहाण

Breaking News | Sangamner Crime: १३ जणांनी एकत्रितपणे दगडफेक करुन जवळून जाणार्‍या एका तरुणालाही लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना.

Sangamner Crime mob pelted stones and beat up the youth

संगमनेर: संगमनेर शहरातील माधव टॉकीजजवळ १३ जणांनी एकत्रितपणे दगडफेक करुन जवळून जाणार्‍या एका तरुणालाही लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे.  तसेच जखमी झालेल्या तरुणाच्या आईला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देत जवळील दोन चारचाकी वाहनांचेही नुकसान केले. सदर घटना शनिवारी (दि. 8 जून) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की माधव टॉकीजजवळील वाडेकर गल्लीतील लीलावती सुभाष गरुडकर व त्यांचा मुलगा हे घरासमोर उभे होते. त्यावेळी तेराजण एकत्रितपणे गरुडकर यांच्या शेजारील मधुकर विठ्ठल नालकर यांच्या घराकडे शिवीगाळ करुन दगडफेक करत होते. त्याचवेळी गरुडकर यांचा मुलगा तेथून जात असताना तेरा जणांनी त्यास लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. यावेळी त्याची आई मध्ये आली असता त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर घटनास्थळावरुन जाताना मुकुंद नारायण गरुडकर यांच्या दोन चारचाकी वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणी जखमी तरुणाची आई लीलावती गरुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तेरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक जाधव करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Sangamner Crime mob pelted stones and beat up the youth

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Stud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here