Home अहमदनगर अहमदनगर: एसटी बस आणि कारची समोरासमोर ठार, दोन तरुणांचा मृत्यू

अहमदनगर: एसटी बस आणि कारची समोरासमोर ठार, दोन तरुणांचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: रात्री एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना.

ST bus and car collide, two youths killed

अहमदनगर:  जिल्ह्यातील जामखेड बटेवाडी शिवारास रविवारी रात्री एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

विजय गंगाधर गव्हाणे (वय २४) पंकज सुरेश तांबे (वय २४) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. अपघातात मयूर संतोष कोळी (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण खर्डा येथून कारने जामखेडच्या दिशेने येत होते.

त्याचवेळी राज्य परिवहन महामंडळाची बस जामखेड येथून खर्डा गावाच्या दिशेने येत होते. बटेवाडी शिवारात दोन्ही वाहने आली असता, कोल्हे पेट्रोल पंपाजवळ त्यांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत बचावकार्य केलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खाजगी रुग्णालयात प्राथामिक उपचार घेतल्यानंतर पाचही तरुणांना अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. अजूनही एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: ST bus and car collide, two youths killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here