Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कंटेनर पलटी

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कंटेनर पलटी

Breaking News | Sangamner Accident: भरधाव वेगाने जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना.

Accident Container overturned on Nashik Pune highway

संगमनेर : भरधाव वेगाने जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना काल रविवारी (दि.९) सकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिकहून संगमनेरच्या दिशेने (एम.एच १४ एल.बी. ६५०७) या क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने येत होता. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ आला असता हा कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. कंटेनर पलटी झाल्याची माहिती समजताच घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली. दोन क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला कंटेनर बाहेर काढण्यात आला. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.

Web Title: Accident Container overturned on Nashik Pune highway

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here