संगमनेर: तुला सेन्ट्रल रेल्वेत नोकरीस लावून देतो असे म्हणत एकास पाच लाखास गंडा
संगमनेर | Crime News: तुला सेन्ट्रल रेल्वेमध्ये टी.सी. म्हणून नोकरी लावून देतो असे आरोपींनी आमिष दाखवून एका जणाची पाच लाखाची फसवणूक केली तसेच पुन्हा पैसे मागितले असता मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली.
याप्रकरणी गोरक्षनाथ लहानू गांडोळे वय २७ रा. कसारे ता. संगमनेर यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी (फिर्यादी) ठिकाणी माझी पत्नी आई वडील व मुले राहतो. माझे १२ वी व आय टी आय पर्यंत शिक्षण झाले आहे. मी सध्या बेरोजगार आहे. मागील चार पाच वर्षापूर्वी मी व नितीन गंगाधर जोंधळे रा. कोकणगाव ता. संगमनेर असे दोघे जण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवाहन श्रीरामपूर येथे कामाला होतो सदर ठिकाणी एक वर्ष काम करून मी पुन्हा घरी आलो. नितीन गंगाधर जोंधळे यास मला काही कामधंदा नाही हे माहित होते. तो मला फोन वर नेहमी नोकरीविषयी विचारपूस करत असे. नितीन गंगाधर जोंधळे रा. अंधेरी मुळचा कोकणगाव याने मी तुला सेन्ट्रल रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो असे म्हणाला मी सध्या सेन्ट्रल रेल्वेमध्ये टी. सी. म्हणून कामाला आहे असे पत्र दाखविले. नितीन जोंधळे म्हणाला की, त्यासाठी तुला पैसे देण्याची गरज आहे. त्यासाठी तुला एकूण १३ लाख रुपये खर्च येईल. मी त्याला टाळत होतो. परंतु त्याने माझे घरातील अशिक्षित आई वडील यांना विश्वासात घेतले व मी तुमच्या मुलाला नोकरीची हमी देतो असे म्हणत होता. मला नोकरीची गरज असल्याने मी दिनांक ३१/१/२०२० सकाळी आठच्या सुमारास मी माझे वडील भाऊ अशांना सदर दिवशी त्याला दोन लाख रुपये रोख त्याच्या राहत्या घरी कोकणगाव येथे नेऊन दिले. त्यावेळी मी माझे वडील व मोठा भाऊ असे हजर होते. तसेच त्याच्या घरी त्याचे घरातील सदस्य हजर होते. त्यावेळी त्याने मला त्याचे दाजींची ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी त्याचे नाव विजयकुमार श्रीपती पाटील व बहिण रेखा विजयकुमार पाटील अशी ओळख करून दिली. सदर रक्कम दिल्यानंतर मी त्याच्याकडे भेटीसाठी फोन करू लागलो त्यावेळी त्याने मला त्याचे मेहुणे विजयकुमार श्रीपती पाटील याच्या नावाचा चेक दिला. त्यावेळी त्याने मला माझे चेकबुक संपले आहे असे सांगितले आहे. तो मला म्हणाला की तू आणखी दोन ते तीन लाख रुपये दे तुला ताबोडतोब लेटर येईल असे म्हणू लागला. तुला नोकरी लागली नाही तर मी जबाबदार आहे. माझ्या हिश्याची जमीन विकून तुझे पैसे परत देईल असे मला वरील साक्षीदारसमोर सांगितले होते. त्यानंतर दि. २८ /०२/२०२१ रोजी नितीन जोंधळे याचे घरी गेलो त्याचे वडील गंगाधर जोंधळे यांच्याकडे ३ लाख रुपये रोख दिले. त्यावेळी नितीन मला म्हणाला की तुला मी या रकमेचा चेक देण्याऐवजी तुला पाच सहा दिवसांत जॉईन लेटर मिळेल त्याचे व त्याच्या वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या घरी गेलो. त्यानंतर पाच ते सहा दिवस उलटून गेल्यावर मी वारंवार त्यास संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. माझा भाऊ व वडिलांना व मला भेटण्यास टाळाटाळ करू लागला. त्यास मी त्याच्या राहत्या घरी व फोन वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो मला फोन वरून म्हणाला की, उर्वरील आठ लाख रुपये घेऊन ये नाहीतर तू दिलेले सर्व पैसे बुडाले असे म्हणून दमदाटी करून शिवीगाळ करू लागला. त्यानंतर आम्ही त्याच्याशी वेळोवेळी संपर्क साधला परंतु तो फोन बंद करून ठेवत असे व घरी देखील मिळत नसे. आम्ही त्याच्या वडिलांना व चुलत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. ते आम्हाला टाळू लागले. एक दिवस त्यांनी आम्हाला मारहाण देखील केली होती. विजयकुमार श्रीपती पाटील व रेखा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते देखील आम्हाला टाळून तुमच्या कुटुंबाला जीवे मारू टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तर तुमचे काही खरे नाही असे गलीच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलीस आमचे काही वाकडे करू शकत नाही. असा दम दिला. नितीन गंगाधर जोंधळे व विजयकुमार श्रीपती पाटील यांच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे.
यावरून संगमनेर पोलीस ठाण्यात गंगाधर प्रभाकर जोंधळे, नितीन गंगाधर जोंधळे रा. कोकणगाव, विजयकुमार श्रीपती पाटील, रेखा विजयकुमार पाटील दोघे रा, नांदेड सिटी पुणे, नितीन जोंधळे (चुलते) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब दातीर हे करीत आहे.
Web Title: Sangamner Crime News job in the railways and saying that, one lakh five lakh looted