Home अहमदनगर इतिहास घडणार: देशातील सर्वात उंच भगवा जिल्ह्यातील या किल्ल्यावर फडकविणार

इतिहास घडणार: देशातील सर्वात उंच भगवा जिल्ह्यातील या किल्ल्यावर फडकविणार

Ahmednagar News allest saffron in the country will be hoisted on this fort 

जामखेड | Ahmednagar News: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्यावर ७४ मीटर उंचीचा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. जगातील सर्वात उंचीचा हा ध्वज असणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. देशामधील प्रमुख धार्मिक ठिकाणी हा ध्वज फिरविण्यात येईल अन नंतर १५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल हा ध्वज तयार झाला असून संत महंताच्या हस्ते पूजन करण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी दिली.

या ध्वजाविषयी रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले  ‘हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे. सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती यांचेही प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील,’ असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ahmednagar News allest saffron in the country will be hoisted on this fort 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here