Home क्राईम संगमनेर: चक्क पोलिसाला मारहाण करून घरात कोंडून ठेवले

संगमनेर: चक्क पोलिसाला मारहाण करून घरात कोंडून ठेवले

Sangamner Crime News: घरात कोंडून घराला बाहेरून कुलूप लावले,  मुलाला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी.

Sangamner Crime policeman was beaten and locked in the house

संगमनेर: किरकोळ कारणातून चक्क पोलिसाला मारहाण करून घरात कोंडून ठेवल्याची घटना संगमनेर तालुक्यात घुलेवाडी परिसरात घडली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल कारभारी खताळ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अलका अनिल खताळ, कुसूम निवृत्ती राहणे, निवृत्ती किसन राहणे, कैलास निवृत्ती राहणे, शरद निवृत्ती राहणे, संतोष निवृत्ती राहणे, लता कैलास राहाणे, निता शरद राहणे, संतोष राहणे याची पत्नी सर्व राहणार चंदनापुरी, राधाकिसन अण्णासाहेब हासे, सुरेखा राधाकिसन हासे रा. राजापूर यांनी गैर कायद्याची मंडळी जमावून हातात काठ्या व गज घेऊन येऊन आपणास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

घरात कोंडून घराला बाहेरून कुलूप लावून घेवून आपणास व आपल्या मुलाला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील १२  जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 148, 452, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक फौजदार फटांगरे करत आहेत.

Web Title: Sangamner Crime policeman was beaten and locked in the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here