Home संगमनेर साकूरमध्ये माकडाचा हल्ला, विद्यार्थिनी जखमी, माकडाची दहशत

साकूरमध्ये माकडाचा हल्ला, विद्यार्थिनी जखमी, माकडाची दहशत

Sangamner | Sakur: माकडाच्या या दहशतीने साकूरचे नागरिक हैराण झाले.

Monkey attack in Sakur, student injured

घारगाव : मागील आठवड्यात बिरेवाडी येथे माकडाने नागरिकांवर हल्ले करत जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आता साकूर येथेही माकडाचे हल्ले वाढत आहेत. बुधवारी सायंकाळी माकडाच्या हल्ल्यात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या.

बुधवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते सातच्या दरम्यान साकूर येथील दोन शाळकरी मुलींना दुखापती केल्या आहेत. त्यापैंकी नगमा मोमीन या विद्यार्थिनीच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर सान्वी इघेही देखील जखमी झाली आहे. नगमाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. माकडाच्या या दहशतीने साकूरचे नागरिक हैराण झाले आहे. हे माकड अचानक नागरिकांच्या अंगावर धावून येते व हल्ला करते. विशेषतः हे माकड लहान मुलांना लक्ष्य करीत हल्ले करत आहे.  वीरभद्र विद्यालयात हे माकड घुसले तेव्हा एकच गोंधळ उडाला होता.

या माकडाला पकडण्यासाठी गुरूवारी सकाळी वनविभागाचे आर एफ ओ श्री. माळी व सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा साकुरमध्ये दाखल झाला होता. दिवसभर माकडाला पकडण्यासाठी जे नाही ते प्रयोग केले होते. तसेच त्यांनी सोबत एक पाळीव माकड आणून त्या आशेने तरी माकड ताब्यात येईल असाही प्रयोग राबविला. परंतु माकड काही हाती लागले नाही. वनविभागाने रमेश फिरोदिया महाविद्यालयाजवळ, वनवे नगर व तास्करवाडी रोड या ठिकाणी पिंजरे लावले आहे. माकडाने वनविभागाचेही टेन्शन वाढविले आहे. कारण माकड दररोज एका तरी व्यक्ती वर हल्ला करत चावा घेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. माकडाला लवकरात लवकर जेरबंद करणेही तितकेच गरजेचे असून वनविभाग अथक प्रयत्न करत आहे. मात्र माकड कधी जेरबंद होणार याचीच उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

Web Title: Monkey attack in Sakur, student injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here